Ad will apear here
Next
महाबळेश्वर गारठले; वेण्णा तलाव परिसरात धुक्याची चादर


महाबळेश्‍वर :
गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला आहे. प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर गरम कपडे, शाली, स्वेटर्स, वूलनचे कपडे घालून फिरताना दिसत आहेत.



अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती नागरिक शेकत बसल्याचे चित्र दिसत आहे. सहा जानेवारी २०२० रोजी महाबळेश्वरातील कमाल तापमान २३.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सात जानेवारीला थंडीचा जोर आणखीच वाढला होता. त्यामुळे प्रसिद्ध वेण्णा तलावावर सहा-सात जानेवारीला भल्या पहाटेपासून धुके मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. त्यामुळे जणू धुक्याची चादरच पसरल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळते आहे. सकाळी वेण्णा तलावावर गेलेले नागरिक मनमुरादपणे याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे महाबळेश्वरमधील थंडी अनुभवण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आदर्श स्थिती निर्माण झाली आहे.

(महाबळेश्वर पर्यटनासंदर्भातील माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUDCI
Similar Posts
श्री खंडोबा-म्हाळसा शाही विवाहाला लाखोंचा जनसागर पाल (ता. कराड, जि. सातारा) : पाल येथे तारळी नदीच्या काठी महाराष्ट्रासह युगानुयुगे भक्तांची आर्त हाक ऐकण्यासाठी उभा असलेला, कष्टकरी व श्रमकरी वर्गाचे दैवत असलेला श्री खंडेराया बुधवारी (आठ जानेवारी २०२०) गोरज मुहूर्तावर मानकरी वर्गाच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार शाही पद्धतीने पिवळ्याधमक झालेल्या पालनगरीमध्ये म्हाळसादेवींशी विवाहबद्ध झाला
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
‘गेटवे ऑफ इंडिया’ला ९५ वर्षे पूर्ण मुंबई : भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ला चार डिसेंबर २०१९ रोजी ९५ वर्षे पूर्ण झाली. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या १९११सालच्या ऐतिहासिक भारत भेटीच्या स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले.
साताऱ्यातील धोंडेवाडी पाझर तलावावर फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन मायणी (सातारा) : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्ष्यांचे धोंडेवाडी पाझर तलावात आगमन झाले आहे. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी या पाझर तलावात दाखल झाले आहेत. फ्लेमिंगोंबरोबर इतर पक्ष्यांचेही थवेच्या थवे येऊ लागले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language